Nityundan Gotriya Bhide Pratishthan
    Quick Registration
 

News
¤

वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी तळेगाव येथे आयोजित केली आहे.


वार्षिक सभा व निवडणूक २०२१
नमस्कार,
भिडे बंधू, भगिनींनो आणि माहेरवाशिणींनो,
आपल्या न्यासाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी तळेगाव येथे आयोजित केली आहे.
त्याच दिवशी दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत वार्षिक निवडणूक होणार आहे. पुर्ण कार्यक्रम पहाण्याकरता
येथे click करा.
हा कार्यक्रम फक्त आजीव सदस्यांकरता आहे, कृपया याची नोंद घ्यावी.

श्री दिलीप भिडे
सचिव
भिडे प्रतिष्ठान
सभासद अर्ज प्रतिष्ठानचे पुरस्कार
आम्ही भिडे अंकासाठी जाहिरातीचे आवाहन आम्ही भिडे अंक
भिडे प्रतिष्ठानची स्वत:ची वास्तू

भिडे प्रतिष्ठानची निर्मिती होऊन सुमारे 16 ते 17 वर्षे झाली. पंधरा वर्षांपूर्वी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला. संगणकाच्या युगात नवी दिशा, कार्यकर्त्यांची वृद्धी, कामाचा वाढता पसारा, प्रतिष्ठानच्या पारदर्शक व्यवहारामुळे लोकांशी निर्माण झालेला सुसंवाद, ह्यामुळे प्रतिष्ठानची वृद्धी होत आहे. ह्याबद्दल दुमत नाही. परंतु आजपावेतो मात्र भिडे प्रतिष्ठानची स्वत:ची वास्तू झालेली नाही. सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वी आम्ही भिडे अंकामध्ये आवाहन केले होते. सध्या गेली अनेक वर्षे पुणे व ठाणे येथील कार्यालयांसाठी अनुक्रमे श्री. शशिकुमार व श्री. चंद्रकांत भिडे ह्या कार्याध्यक्षांच्या औदार्यामुळे प्रतिष्ठान त्यांच्या मालकीच्या जागा विनामूल्य वापरत आहे. ह्याशिवाय प्रतिष्ठानच्या वेळोवेळी होणार्‍या बैठकांसाठी सुद्धा नेहमीच मदत करीत असतात त्याबद्दल प्रतिष्ठान त्यांचे ऋणी आहे. परंतु मुद्दा असा आहे की, आपण किती वर्षे त्यांना त्रास द्यायचा? ह्या दृष्टिकोनातून पुण्यामुध्ये मध्यवस्तीच्या ठिकाणी किमान 100 चौ. फुटांची तसेच मुंबई येथे डोंबिवली, ठाणे, कल्याण ह्या उपनगरात पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर, नाममात्र भाड्याने अथवा कोणी दानशूर भिडे कुलोत्पन्न प्रतिष्ठानकरिता जागेची देणगी देणार्‍यांनी सुद्धा विचार करावा. 100 चौ. फुटापेक्षा अधिक मोठी जागा उपलब्ध असेल तर भिडे कुलातील शिकणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी किंवा बाहेरगांवहून येणार्‍या भिडे व्यक्तींची सुद्धा त्या ठिकाणी सोय होईल असा सर्वंकष विचार करून हे आवाहन केले आहे. कार्यालयात कामासाठी येणार्‍या व्यक्तीला आणि काम करणार्‍या आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा सोईचे होईल. सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वी ‘आम्ही भिडे’च्या अंकात ह्या संबंधी आवाहन प्रसारित केले होते. परंतु पुन्हा एकदा आपण सर्वांनी ह्याचा विचार करावा असे मला वाटते. येणाऱ्या पुढील कुलसंमेलनापर्यंत भिडे प्रतिष्ठानची स्वत:ची वास्तू निर्मिती करायची असा निर्धार करू या.

-दिलीप भिडे, सचिव/विश्‍वस्त, पुणे.
वाढदिवसानिमित्त देणगी

व्यक्तिगत आर्थिक स्थैर्याचा निकष संस्थेच्या प्रगतीसाठी तितकाच आवश्यक असतो. संस्था आर्थिक दृष्ट्या सुद्रुढ व्हावी व सर्व सदस्यांच्या सहाय्याने हे उद्दिष्ट साधावे ह्या हेतूने नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठानला आपल्या वाढदिवसानिमित्त देणगी देऊन आपला वाढदिवस साजरा करा.


Home  |  Contact Us  |  Sitemap  |  Disclaimer  |  Mail  |  Email  |  Login  |  SMS
2009, All rights reserved Nityundan Gotriya Bhide Pratishthan, Mumbai, India.
Maintained by Infotools, Pune, Bharat
  |   *Last updated on :23 November, 2017   |   Add this website to favorites!