|
प्रतिष्ठानचे पुरस्कार -- 2020
|
1) साहस किंवा क्रीडा पुरस्कार -
भिडे कुटुंबातील साहसीवृत्तीय किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणार्या भिडे कुलोत्त्पन्न व्यक्तीस
हा पुरस्कार दिला जात श्रिी. रा. म. भिडे पुरस्कृत कै. श्रीकृष्ण भिडे (श्रीकृष्ण भिडे प्रतिष्ठान) ह्यांचे स्मरणार्र्थें
|
2) माझी आई पुरस्कार -
भिडे कुलोत्पन्नातील गृहिणी, ज्येष्ठ स्त्री असावी, तसेच अल्प उत्पन्न
व प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन मुलांकरिता किंवा स्वत:च्या कुटुंबाकरिता विशेष कार्य करणारी
स्त्री (श्री. रविंद्र रावजी भिडे, कल्याण पुरस्कृत त्यांच्या मातोश्री कै. सुशीला रावजी भिडे यांचे स्मरणार्थ)
|
3)आपली सून पुरस्कार -
सुसंस्काराचा वारसा सतत पुढे नेण्याचे कार्य करणारी किंवा विशेष प्राविण्य अथवा विशेष पारितोषिक मिळालेली
किंवा समाज कार्यात अग्रेसर असणारी किंवा अध्यात्मिक क्षेत्रात प्रचारकार्य करणारी किंवा विशेष लेखन करणारी
किंवा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन मुलांसाठी, कुटुंबासाठी विशेष धडपड करणारी असावी. (सौ. मेधा उर्फ अनुराधा अविनाश भिडे, मिरज पुरस्कृत)
|
4)कला पुरस्कार -
संगीत, नाटक, सिनेमा किंवा इतर कला क्षेत्रातील काम करणारी खास भिडे व्यक्ती असावी.
(श्री. कुमार आणि वसंत विष्णू भिडे, सांगली पुरस्कृत, यांचे बंधू कै. सुभाष विष्णू भिडे, सांगली यांचे स्मरणार्थ)
|
5)उद्योजक पुरस्कार -
लघुउद्योजक किंवा नव्याने व्यवसाय, उद्योग सुरू केलेला धडाडीने, कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा नेटाने व्यवसाय वृद्धी करणार्या तरुण भिडे व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
(श्री. कुमार विष्णू भिडे, सांगली पुरस्कृत यांचे वडील कै. विष्णू विनायक तथा अण्णासाहेब भिडे, सांगली यांचे स्मरणार्थ)
|
|
|
|
वाढदिवसानिमित्त देणगी |
व्यक्तिगत आर्थिक स्थैर्याचा निकष संस्थेच्या प्रगतीसाठी तितकाच आवश्यक असतो. संस्था आर्थिक दृष्ट्या सुद्रुढ
व्हावी व सर्व सदस्यांच्या सहाय्याने हे उद्दिष्ट साधावे ह्या हेतूने नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठानला आपल्या वाढदिवसानिमित्त
देणगी देऊन आपला वाढदिवस साजरा करा.
|
|
|